Pune Bus Accident: अतिवेगाने येणाऱ्या पीएमपीएमपीएल दोन बसची धडक, चालकासह 29 प्रवाशी जखमेत (Watch Video)

दोन बस एकमेंकाना धडकल्यामुळे दुर्घटनै घडली.या घटनेत चालक आणि कंडक्टरसह २९ प्रवाशी जखेत आहे.

Bus accident PC Twitter

Pune Bus Accident:  पुणे नगर महामार्गावर दोन बसच्या धडकेत प्रवाशी जखमी झाले आहे. परिसरातील बीआयटी मार्गावर पीएमपीएमपीएल (PMPML) दोन बस समोरासमोर येवून धडकल्या. मंगळवारी सकाळी 8 च्या दरम्यान ही घटना घडून आली. या भीषण घटनेत प्रवाशांसह चालकांला जखमा झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीआयटीच्या स्टॉपवर हे घडून आली. दोन्ही बसचा स्पीड हा जास्त असल्याने ही घटना घडून आली. बसच्या एकमेकांना समोरून धडक लागल्याने बसचा समोरील भाग हा अंत्यत वाईटरित्या उद्धवस्त झाली आहे. या धडकेत प्रवाशांना जखमा झाल्या आहे. चालकांला गंभीर जखमा झाल्याचे समोर येत आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि परिसरातील इतर स्थानक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीसांनी घटनेची नोदं घेतली आहे. अतिवेगात गाडी चालवल्यामुळे दोन बसचे नुकसान झाले आणि प्रवाशांना देखील जखमा झाल्या आहेत. बस वेगात असल्यामुळे दोन्ही बस एकमेकांना धडकल्या. या धडकेत  गाडी चालक आणि कंडक्टरसह २९ जणांना जखमा झाल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now