Pune Bus Accident: अतिवेगाने येणाऱ्या पीएमपीएमपीएल दोन बसची धडक, चालकासह 29 प्रवाशी जखमेत (Watch Video)
दोन बस एकमेंकाना धडकल्यामुळे दुर्घटनै घडली.या घटनेत चालक आणि कंडक्टरसह २९ प्रवाशी जखेत आहे.
Pune Bus Accident: पुणे नगर महामार्गावर दोन बसच्या धडकेत प्रवाशी जखमी झाले आहे. परिसरातील बीआयटी मार्गावर पीएमपीएमपीएल (PMPML) दोन बस समोरासमोर येवून धडकल्या. मंगळवारी सकाळी 8 च्या दरम्यान ही घटना घडून आली. या भीषण घटनेत प्रवाशांसह चालकांला जखमा झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीआयटीच्या स्टॉपवर हे घडून आली. दोन्ही बसचा स्पीड हा जास्त असल्याने ही घटना घडून आली. बसच्या एकमेकांना समोरून धडक लागल्याने बसचा समोरील भाग हा अंत्यत वाईटरित्या उद्धवस्त झाली आहे. या धडकेत प्रवाशांना जखमा झाल्या आहे. चालकांला गंभीर जखमा झाल्याचे समोर येत आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि परिसरातील इतर स्थानक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीसांनी घटनेची नोदं घेतली आहे. अतिवेगात गाडी चालवल्यामुळे दोन बसचे नुकसान झाले आणि प्रवाशांना देखील जखमा झाल्या आहेत. बस वेगात असल्यामुळे दोन्ही बस एकमेकांना धडकल्या. या धडकेत गाडी चालक आणि कंडक्टरसह २९ जणांना जखमा झाल्या आहे.
नगर रस्त्यावर बीआरटी मार्गावर भीषण अपघात; चालकांसह 29 प्रवासी गंभीर जखमी#Pune pic.twitter.com/EqFUJWSTsl
— Lokmat (@lokmat) August 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2023 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

