Robbery at Chitale Bandhu Sweet Shop: चितळे बंधू यांच्या बाणेर येथील शाखेत चोरी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

पुणे येथील बानेर परिसरातील चितळे बंधू यांच्या मिठाई दुकानात रविवारी पहाटे चोरी झाली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

Chitale Bandhu Sweet Shop | (Photo Credit-X)

पुणे येथील बाणेर परिसरातील चितळे बंधू मिठाई दुकानात रविवारी (27 ऑक्टोबर) मोठी चोरी झाली. काही चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुकानात प्रवेश मिळवला आणि काऊंटर फोडून गल्ल्यातील रक्कम लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या रोख रक्कम आणि मुद्देमालाचा पंचनामा केला जात आहे. या आधीही शहरात येरवडा येथील एका दुकानातून अंबा बर्फी आणि सुकामेव्याची चोरी आणि कोंढवा येथील एका बारमध्ये आणखी एक चोरी अशा घटना घडल्या आहेत. त्यासोबतच घरफोडीच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याच श्रृंकलेतील मिठाईच्या दुकानातील चोरीकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओही पुढे आला आहे. ज्यामध्ये चितळे बंधूच्या बानेर शाखेतील सी. सी. टी. व्ही. फुटेजमध्ये एक घुसखोर रोख रक्कम उचलताना दिसत आहे, ज्यामुळे चोरीची पुष्टी होते. अधिकाऱ्यांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी, जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यासाठी आणि मागील प्रकरणांच्या नमुन्यांचा आढावा घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू केली आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना पुढील घटना रोखण्यासाठी कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now