Buldhana Food Poisoning: बुलढाण्यात 500 जणांना 'प्रसादा'मधून विषबाधा; रस्त्यावरच उपचार दिले जात असल्याचा व्हिडिओ वायरल

झाडावर सलाईनच्या बाटल्या लटकून उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Food Poisoning

बुलढाण्यात 500 जणांना प्रसादामधून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणार मध्ये एका धार्मिक सोहळ्यातील ही घटना आहे. हरिनाम सप्ताह नंतर भाविकांनी प्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ, चक्कर येणं असे प्रकार सुरू झाले. यानंतर अनेकांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र अपुर्‍या रूग्णशय्यांमुळे काहींवर अगदी रस्त्यावरच उपचार करावे लागत असल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. झाडावर सलाईनच्या बाटल्या लटकून उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now