Boy Drowns In Rainwater Filled Pit: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; Uttan येथील धक्कादायक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एडू कंपाऊंड परिसरात ही घटना घडली.

Representational Image (File Photo)

Boy Drowns In Rainwater Filled Pit: भाईंदरजवळील उत्तन येथील किनारपट्टी भागात, एका खाजगी मालमत्तेत असलेल्या पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून एका सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एडू कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. किरण हर्षद कोल्हार (6) असे मृत मुलाचे नाव असून, तो काशिमीरा येथील रहिवाशी आहे. किरण उत्तन येथील आपल्या आजीच्या घरी काही दिवस घालवण्यासाठी आला होता, त्यावेळी ही घटना घडली. अहवालानुसार, किरण त्याच्या चुलत भावांसह खेळण्यासाठी बाहेर गेला होता. काही वेळाने त्याचे भाऊ घरी आले, मात्र तो परत आला नाही. त्याचा शोध सुरु केला असता, पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ त्याची चप्पल सापडली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खड्ड्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)