शिवसेना नेते Anandrao Adsul यांना दिलासा देण्यास Bombay High Court कडून नकार
आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणीच काही दिवसांपूर्वी ईडी त्यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले असताना त्यांची प्रकृती बिघडली आणि ते आता मुंबईत एका रूग्णालयात उपचार घेत आहेत.
सध्या ईडीच्या रडार वर असलेल्या शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये ईडी कडून पाठवण्यात आलेला समन्स खारीज करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारा केली होती. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 8 ऑक्टोबरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)