Maharashtra Political Crisis: 'पाठीत वार करण्याचा भाजपचा इतिहास', शपथविधी नंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया

अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Of Maharashtra) शपथ घेतली आहे. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "जे नेते कालपर्यंत विरोधी पक्षात होते आणि सरकारवर टीका करायचे, तेच नेते आज त्याच सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज भाजपला अजित पवार हवे होते, म्हणून त्यांनी त्यांना घेतले, पण आपण विसरता कामा नये. पाठीत वार करण्याचा भाजपचा इतिहास आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement