Jaykumar Gore Health Update: भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट

आज भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी गोरे यांची रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.

Udayanraje Bhosale meet Jaykumar Gore (PC - Twitter)

Jaykumar Gore Health Update: साताऱ्याहून माण-खटावच्या दिशेनं येत असताना भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला फलटणजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघात जयकुमार गोरे हे जखमी झाले होते. आज भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी गोरे यांची रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. जयकुमार गोरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आमचे मित्र आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व कुटुंबियांना धीर दिला. जयकुमार यांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. ते लवकरच बरे होऊन लोकांच्या सेवेत रुजू होतील.' (हेही वाचा - Jaykumar Gore Health Update: आमदार जयकुमार गोरे यांची कार अपघातानंतर प्रकृती स्थिर, पीएची प्रकृती थोडी चिंतेची; आमदार राहुल कुल यांची माहिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)