Jaykumar Gore Health Update: भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट
आज भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी गोरे यांची रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली.
Jaykumar Gore Health Update: साताऱ्याहून माण-खटावच्या दिशेनं येत असताना भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला फलटणजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघात जयकुमार गोरे हे जखमी झाले होते. आज भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी गोरे यांची रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. जयकुमार गोरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आमचे मित्र आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व कुटुंबियांना धीर दिला. जयकुमार यांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. ते लवकरच बरे होऊन लोकांच्या सेवेत रुजू होतील.' (हेही वाचा - Jaykumar Gore Health Update: आमदार जयकुमार गोरे यांची कार अपघातानंतर प्रकृती स्थिर, पीएची प्रकृती थोडी चिंतेची; आमदार राहुल कुल यांची माहिती)
आमचे मित्र आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रुबी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व कुटुंबियांना धीर दिला. जयकुमार यांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना केल्या. ते लवकरच बरे होऊन लोकांच्या सेवेत रुजू होतील. pic.twitter.com/FEm7EaZkX3
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 02:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

