Navneet Rana: मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा हरूनही मी जिंकली, पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रीया
लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता.
लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर, नवनीत राणा गुरुवारी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आल्या. यावेळी त्यांनी पराभवावर भाष्य केलं. "मला वाटते की, पंतप्रधान मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा हरूनही मी जिंकले. खेद एवढाच असेल की 2019 मध्ये अमरावतीच्या जनतेने मला अपक्ष उमेदवार म्हणून विजयी केले, पण मी काय केले? 2024 मध्ये माझ्या अमरावतीच्या लोकांनी मला इथे पराभूत केले का ? याचा मी विचार करत असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)