Pune Temperature: पुणेकरांना उष्णतेपासून दिलासा! 2 ते 3 मे पासून तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज
येत्या 3-4 दिवसात मुंबई, पुणे शहरात तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
Pune Temperature: गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे शहरासह राज्यातील सर्वच भागात तापमानाचा (Pune Temperature) पारा बराच वाढला होता. पुण्यात 41- 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान गेले होते. त्यात आता हवामान विभागाने नवी माहिती दिली आहे. येत्या 3-4 दिवसात मुंबई, पुणे शहरात तापमान कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तापमानात 4-5 अंशांनी घट होण्याची अपेक्षा आहे. 2-3 मे पासून तापमानात घट होण्याची अपेक्षा आहे. पश्चिमेकडील वारे मुंबई-पुणे पट्ट्यात वाहनार असल्याने हवामानात हा बदल होणार आहे.
2-3 मे पासून तापमानात घट होण्याची अपेक्षा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)