Bhiwandi Fire: भिवंडीतील बंद कापड कारखान्यात भीषण आग; कोट्यवधींची संपत्ती जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
बंद कापड कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींची संपत्ती जळून खाक झाली
भिवंडीतील काजी कंपाऊंडमध्ये काल रात्री एका बंद कापड कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींची संपत्ती जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ठाणे महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीही भिवंडीतील एका गोदामाला आग लागली होती. त्या घटनेत तीन जण जखमी झाले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)