Bharat Gaurav Circuit Yatra: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ भारतीय रेल्वेकडून 'भारत गौरव सर्किट यात्रे'ची घोषणा; शिवरायांशी संबंधित स्थळे ट्रेनद्वारे जोडली जाणार (Video)
अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व क्षेत्रे ‘भारत गौरव सर्किट ट्रेन'ने जोडली जातील. प्रश्नोत्तराच्या तासात खासदार अरविंद सावंत यांच्या पुरवणी प्रश्नाचे उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ विशेष भारत गौरव सर्किट यात्रा जाहीर केली आहे. अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित सर्व क्षेत्रे ‘भारत गौरव सर्किट ट्रेन'ने जोडली जातील. प्रश्नोत्तराच्या तासात खासदार अरविंद सावंत यांच्या पुरवणी प्रश्नाचे उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. सावंत यांनी सरकारच्या 'भारत गौरव ट्रेन' धोरणाचे कौतुक केले आणि म्हटले की, त्यात रामायण यात्रा, दक्षिण भारत यात्रा, गुजरात यात्रा यासह अनेक तीर्थस्थळांचा समावेश आहे. त्यांनी विचारले की, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळे 'भारत गौरव' सर्किटशी जोडण्याची काही योजना आहे का?.
याला उत्तर देताना वैष्णव म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि काळाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांना जोडण्याच्या योजनांवर काम आधीच प्रगतीपथावर आहे आणि ही ठिकाणे भारत गौरव सर्किट यात्रेद्वारे एकमेकांशी जोडली जातील.’ छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया घातला. महाराष्ट्र/कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि काळाशी संबंधित किल्ले, राजवाडे, युद्धभूमी इत्यादी अनेक महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे आहेत. (हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary: येत्या 3 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या बाबी)
Bharat Gaurav Circuit Yatra Honouring Chhatrapati Shivaji Maharaj: