Beed Shocker: जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले; रात्रभर ओलीस ठेऊन केली मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)
निर्जनस्थळी कार थांबवून गुंडांनी वेटरला मारहाण करून, त्याच्या खिशातील 11 हजार हिसकावले. तसेच वेटरच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला रात्रभर कारमध्ये ठेवले.
महाराष्ट्रातील बीडमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका वेटरला ग्राहकांना जेवणाचे बिल मागणे महागात पडले आहे. अहवालानुसार, काही तरुण महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर वेटरने त्यांना बिल दिले मात्र त्यानंतर ते कारमधून पळू लागले. बिलासाठी वेटर त्यांच्या गाडीला लटकला, त्यानंतर गुंडांनी त्याला कारमध्ये 1 किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
निर्जनस्थळी कार थांबवून गुंडांनी वेटरला मारहाण करून, त्याच्या खिशातील 11 हजार हिसकावले. तसेच वेटरच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला रात्रभर कारमध्ये ठेवले. या घटनेनंतर पीडित तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून, नागरिकांनी न्यायाची मागणी केली आहे. लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर दबाव वाढत आहे. (हेही वाचा: Medical Negligence in Latur: लातूरमध्ये रुग्णालयात बाळंतिणीच्या जीवाशी खेळ; प्रसूतीनंतर रक्त पुसण्यासाठी वापरलेले कापड पोटात ठेवून घातले टाके)
जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)