Beed News: बीड शहरात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा अचानक मृत्यू; घटनेचा Video Viral

बीड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने जागीच मृत्यू झाला. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बीड शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने जागीच मृत्यू झाला. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाबासाहेब मिसाळ, असं मयत शिक्षकांच नाव आहे. ते बीडच्या वारोळा या आश्रम शाळेवर कर्तव्यावर होते. सकाळी बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता पेट्रोल भरण्याअगोदर ते खाली कोसळले. नागरिकांनी मिसाळ यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now