Beed Viral Accident: बीडमध्ये जेवणाचं बिल मागितल्याने वेटरला फरफटत नेलं; घटना सीसीटीव्हीत कैद

याप्रकरणी तक्रारीवरुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

बीडमध्ये  जेवण झाल्यानंतर स्कॅनर गाडीजवळ घेऊन बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या वेटरला बिल देण्यास नकार देत एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना समोर आली आहे. यासोबतच गाडीतील तिघांनी वेटरला मारहाण देखील केली आहे. या वेटरला या तिघांनी रात्रभर ओलीस देखील ठेवले होते. ही घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तक्रारीवरुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now