Mumbai Shocker: मुंबईत वाहतूक पोलिसाला वाहन चालकाकडून मारहाण; व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी एका 53 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वाहतूक पोलिसाला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

वाहतुकीचे नियम मोडल्यावर एका वाहनचालकाची चौकशी करत असताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना कुर्ल्यात घडली आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी एका 53 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वाहतूक पोलिसाला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. तसेच पोलीस हवालदाराला मारहाण होत असताना या ठिकाणी अनेक जण जमा झालेले देखीस व्हिडीओत दिसत आहे. कुर्ला येथे  खालीद इसाक वसईकर याने स्कूटर चालवत असताना सिग्नल तोडून पळून जात होता. मात्र त्याला वाहतूक हवालदारने पकडले आणि याबाबत चौकशी करत असताना खालीद याने त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली होती.

पहा व्हिडीओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement