Mumbai Viral Video: मुंबईत सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई वाहून गेली

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर पावसाळ्यात फिरायला जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Bandra Band stand Video

मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवरील (Bandstand) काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) मुलांच्या डोळ्यादेखत त्यांची आई पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे. मुले मम्मी. मम्मी म्हणत ओरडत असतानाच आईच्या सेल्फी काढण्याच्या मोहाने ही भयंकर दुर्घटना घडली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे वाहत्या पाण्यात मध्यभागी बसून फोटो काढत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्यांची मुलेही किनाऱ्यावर उभे राहून बाहेर येण्यासाठी आवाज देत असल्याचे दिसत आहेत. मात्र त्यांचा हा हलगर्जीपणाच त्यांना महागात पडला. काही वेळाने मागून येणारा पाण्याचा प्रवाह दोघांनाही पाडतो. ज्यामुळे ते दोघेही पाण्यात वाहून जातात.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now