Crocodile Trail In Rani Baug: राणीच्या बागेत सुरू झाला आशियातील पहिला 'क्रोकोडाइल ट्रेल'; आता पर्यटकांना पाहता येणार पाण्याखालील मगरी आणि घरियाल

162 वर्षीय जुन्या वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल गार्डन आणि प्राणीशास्त्र संग्रहालयाने मगरी आणि घरियाल पाहण्यासाठी पाण्याखालील दृश्य डेकसह 'क्रोकोडाइल ट्रेल' लाँच केले आहे. जे आशियातील पहिले 'क्रोकोडाइल ट्रेल' आहे.

Crocodile Trail In Rani Baug (PC - Twitter)

Crocodile Trail In Rani Baug: राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण, आता येथे येणाऱ्या पर्यटकांना चक्क पाण्याखालील मगरी आणि घरियाल पाहता येणार आहे. 162 वर्षीय जुन्या वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल गार्डन आणि प्राणीशास्त्र संग्रहालयाने मगरी आणि घरियाल पाहण्यासाठी पाण्याखालील दृश्य डेकसह 'क्रोकोडाइल ट्रेल' लाँच केले आहे. जे आशियातील पहिले 'क्रोकोडाइल ट्रेल' आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. राणीच्या बागेत सध्या तीन मगरी आणि दोन घारियाल आहेत. सुमारे एक एकर पाणी आणि हिरवळ पसरलेल्या, क्रोक ट्रेलमध्ये मगरी आणि घरियाल यांच्यासाठी स्वतंत्र एन्क्लोजर आहेत. थोड्याच दिवसात देशातील इतर प्राणीसंग्रहालयांमधून येथे आणखी काही मगरी सोडण्यात येणार आहेत. (हेही वाचा - BMC: मुंबईमध्ये 2022 पासून खड्ड्यांच्या 14,000 हून अधिक तक्रारी प्रलंबित; विरोधकांकडून BMC वर टीका)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement