Ashadhi Ekadashi 2024: चर्चगेट स्थानकात आषाढी एकादशीचा उत्साह; अभंग, भजन, कीर्तनात रंगेल मुंबईकर (Watch Video)
चर्चगेट स्थानकावर मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीचा उत्सव साजरी केला जात आहे. पश्चिम रेल्वे प्रवाशी भजनी मंडळाच्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांमध्ये वारकाऱ्यांनी अभंग, भजन, कीर्तन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
Ashadhi Ekadashi 2024 : राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पहायला मिळात आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. मुंबईतही विठुरायाचे भक्त वारकरी रंगात रंगले आहे. आज चर्चगेट स्थानकावर मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीचा उत्सव मुंबईकरांनी साजरी केला. पश्चिम रेल्वे प्रवाशी भजनी मंडळाच्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांमध्ये वारकाऱ्यांनी अभंग, भजन, कीर्तन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विठ्ठल रूक्मिणी मंदिर सध्या 24 तास दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. (हेही वाचा:Pandharpur News: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन व्यवस्था करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा,103 कोटींचा निधी खर्चणार )
पोस्ट पहा:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)