Pandharpur News: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन व्यवस्था करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा,103 कोटींचा निधी खर्चणार
पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. भाविकांना सुलभ आणि कमीत कमी वेळेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Pandharpur News: आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढपूर वारकऱ्यांच्या गर्दीने गजबजले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची (vitthal rukmini mandir)शासकीय महापूजा पार पडली. या महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा मंदिरातील सभामंडपात सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरासाठी मोठी घोषणा केली.पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था करणार, या दर्शन व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून तब्बल 103 कोटींचा निधी देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. लवकरात लवकर हा निधी राज्य सरकारकडून आपल्याला मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभामंडपात दिली.
दरम्यान, टोकण दर्शन व्यवस्थेनंतर भाविकांना केवळ दोन तासात विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. गोपाळपूर रोडवरील पत्रास शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारून टोकण व्यवस्था केली जाणार आहे. सध्या विठ्ठल दर्शनासाठी 17 ते 18 तास लागतात.
टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार झाल्यास भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाविकांच्या वेळेची बचत होणर असून रांगेत उभे राहण्याचा त्रास देखील सहन करावा लागणार नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2024 09:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

