राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून हे पद रिक्त होते. पुढील तीन वर्षांसाठी चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत. 4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होते.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून हे पद रिक्त होतं. पुढील तीन वर्षांसाठी चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/N457JayDCD
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)