शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे यांची तर, उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्रीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
शिवसेना पक्ष प्रमुख @OfficeofUT यांच्याकडून #ठाणे जिल्हा प्रमुख पदी केदार दिघे यांची तर उपनेतेपदी तसेच अनिता बिर्जे यांची नियुक्ती करण्यात आली. @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/jELxVIQdFU
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)