APMC Election Result 2023: परळी-अंबाजोगाईसह बीड मधील 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवल्यानंतर धनंजय मुंडे झाले भावूक; आई ला यश अर्पण (Watch Video)
परळी-अंबाजोगाईसह बीड मधील 6 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवल्यानंतर धनंजय मुंडे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
धनंजय मुंडे यांनी पुन्हा APMC Election Result मध्येही पंकजा मुंडेंचा दारूण पराभव केला आहे. परळी-अंबाजोगाईसह बीड मधील 6 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विजय मिळवल्यानंतर धनंजय मुंडे भावूक झाल्याचं पहायला मिळालं. धनंजय मुंडे यांनी आपलं यश आईच्या चरणी अर्पण केल्याचं ट्वीट केलं आहे. विजयाच्या गुलालात माखलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या आईची भेट घेतली. तसेच यावेळी अण्णांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असंही नमूद केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)