Karjat Bazar Samiti: कर्जत बाजार समितीवर भाजपचा झेंडा, आमदार रोहित पवारांना मोठा धक्का

यावेळी रोहित पवारांची मते फुटल्याने राम शिंदे यांच्या गटाचा सभापती आणि उपसभापती झाला. निवडणूकीत दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.

Karjat Bazar Samiti

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि राम शिंदे (Ram Shinde) या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड आज पार पडली. या निवडणूकीत रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणूकीत भाजपचे काकासाहेब तापकीर यांची सभापतीपदी तर अभय पाटील उपसभापती यांनी विजय मिळवला आहे. यावेळी रोहित पवारांची मते फुटल्याने राम शिंदे यांच्या गटाचा सभापती आणि उपसभापती झाला. निवडणूकीत दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now