State Government Literary Awards: राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा; ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)