Lalit Patil Drug Case: अंधेरी न्यायालयाने ड्रग्ज माफिया ललित पाटीलला 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
महाराष्ट्रात ललित फरार असण्यावरून राजकारण रंगलं होतं. आरोप- प्रत्यारोप होत होते. एका बड्या नेत्याच्या मदतीनेच ललित पाटील पळून गेल्याचा आरोपही करण्यात आला होता
पुण्याच्या (Pune) ससून हॉस्पिटल (Sasson Hospital) मधून अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर त्याला अंधेरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटीलला कोर्टाने 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा एक भाग आहे. ड्रग सिंडिकेट त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)