Anant Ambani-Radhika Merchant Wedding: मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा; मुंबई पोलिसांनी 12 ते 15 जुलैसाठी जारी केले वाहतूक निर्बंध

त्यानंतर 14 जुलै रोजी वेडिंग रिसेप्शन आयोजित केले आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्येच होणार आहेत.

Anant Ambani, Radhika Merchant (PC - Twitter/@mpparimal)

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत 12 जुलैला विवाहबंधनात अडकणार आहे. हा विवाहसोहळा मुंबईमध्ये बीकेसी परिसरात जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या हाय-प्रोफाइल विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी जनतेची कमीत कमी गैरसोय सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत.

शुक्रवारी 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा लग्न सोहळा झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी 13 जुलै रोजी आशीर्वाद समारंभ होईल. त्यानंतर 14 जुलै रोजी वेडिंग रिसेप्शन आयोजित केले आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्येच होणार आहेत. कार्यक्रमाच्या अनुषंगाने अति महत्त्वाच्या व्यक्ती व मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमामुळे नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार बीकेसी परिसरात, 12 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 रोजी तात्पुरत्या स्वरूपात वाहतूकीचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. (हेही वाचा: Mumbai: अखेर वाहतुकीसाठी खुला झाला गोखले पुलाला जोडणाऱ्या सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाचा काही भाग)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif