Amaravati Express Fire: अमरावती एक्स्प्रेसला आग, मुंबईतील दादर टर्मिनलवरील घटना

अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे.

Amaravati Express Fire : PC YOUTUBE

Amaravati Express Fire: अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागल्याने ही बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावीत एक्स्प्रेसच्या बी ९ च्या कोसमधून धूर दिसल्यानंतर ही घटना समोर आली.  आग किरकोळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु आगीच्या घटनेमुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून उतरून आग विझवली. (हेही वाचा-  माळशेज घाटात दोन टॅंकरची धडक, भीषण अपघातात चार दगावले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now