Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब घेणार लालबागच्या राजाचे दर्शन, मुंबई दौरा चर्चेत

अमित शाह लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठात साडे पाच वाजता हजेरी लावतील आणि सात वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील.

Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) शनिवारी (23 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईतील लालबाग राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी अमित शाह मुंबईत येणार आहेत. अमित शाह यांचे उद्या दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल यानंतर ते 3 वाजता लालबागच्या राजाचे दर्शन घेतील. यानंतर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पांचे दर्शन घेणार. यानंतर ते लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठात साडे पाच वाजता हजेरी लावतील आणि सात वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement