Ambernath Road Rage: अंबरनाथमध्ये रोड रेजची धक्कादायक घटना; कार चालकाने व्यक्तीला धडक देऊन फरफटत नेले, नंतर एका गाडीला दिली जोरदार टक्कर (Watch Video)
आधी त्याने एका कारस्वाराला धडक दिली आणि नंतर एका व्यक्तीला गाडीखाली फरफटत नेले. त्यानंतर त्याने या व्यक्तीला जोरदार धडकही दिली. नंतर एसयूव्ही ड्रायव्हरने यू-टर्न घेतला आणि दुसऱ्या एका कारला धडक दिली.
Ambernath Road Rage: महाराष्ट्रातील अंबरनाथ येथून रोड रेजची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका माथेफिरू एसयूव्ही चालकाने आपल्या कारने 5 जणांना चिरडले. आधी त्याने एका कारस्वाराला धडक दिली आणि नंतर एका व्यक्तीला गाडीखाली फरफटत नेले. त्यानंतर त्याने या व्यक्तीला जोरदार धडकही दिली. नंतर एसयूव्ही ड्रायव्हरने यू-टर्न घेतला आणि दुसऱ्या एका कारला धडक दिली. त्या कारमध्ये काही मुले आणि एक महिला बसलेली दिसत आहेत. शेवटी, काही लोकांनी एसयूव्ही कारवर दगडफेक केली व त्यानंतर ते पीडितेच्या मदतीसाठी धावले. या घटनेचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. कार चालकाच्या या कृत्याने संपूर्ण रस्त्यावर गोंधळ उडाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच ठाणे पोलिसांनी या घटनेची माहिती अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Viral Video: अटल मार्गावर प्रवाशांसह ऑटो चालकाचा जीवघेणा स्टंट, व्हिडीओ व्हायरल)
अंबरनाथमध्ये रोड रेजची थरारक घटना-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)