औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे यांच्यात जुंपली (Watch Video)
संदिपान भुमरे यांनी सार्यांना सारखाच निधी दिला असल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच हमरीतुमरी झाली नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.
औरंगाबाद मध्ये आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरेंवर आवाज चढवला आणि त्यांच्यात बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी कमी मिळत असल्याची तक्रार केली. तेव्हा त्यांचा उल्लेख मंत्र्यांकडून एकेरी करण्यात आला. यावरून दानवे चिडले आणि जागेवर ताडकन उभं राहून बोलू लागले. त्यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे.
पहा ट्वीट