Nashik Accident News: वणी सप्तश्रृंगी घाटातील बस अपघातातील अपघातग्रस्तांबद्दल अजित पवार यांच्या संवेदना

नाशिक जिल्ह्यातील वणी संप्तश्रृगी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून अपघातग्रस्तांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Accident (PC - File Photo)

नाशिक जिल्ह्यातील वणी संप्तश्रृगी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. इतर जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून अपघातग्रस्तांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. अजित पवार यांनी ट्विटरवर भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात एसटी बस दरीत कोसळून झालेल्या अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.

नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन यासंदर्भात माहिती घेतली असून अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीनं आणि मोफत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो ही प्रार्थना, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now