Lalbaugcha Raja 2023: अजित पवार लवकर राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे; दादांच्या समर्थकाची 'लालबागच्या राजाच्या' चरणी चिठ्ठी

अजित पवार सुनील तटकरे, पार्थ पवार यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचले होते.

Ajit Pawar | Twitter

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे. देशापरदेशातून कोट्यावधी लोकं दिवसाला 'लालबागच्या राजाचं' दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवात गर्दी करतात. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी  त्यांच्या एका समर्थकाने बाप्पाच्या चरणी 'अजित पवार लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे' अशी आपली इच्छा चिठ्ठीत लिहून ती बाप्पाच्या चरणी अर्पण केली आहे. सध्या त्या चिठ्ठीचा फोटो वायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी एका भाविकाने टीम इंडिया यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप जिंकू दे अशीही लिहलेली चिठ्ठी वायरल झाली होती.

पहा अजित दादांच्या समर्थकाचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now