Ajit Pawar On New NCP Working Presidents: सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याच्या घोषणेनंतर अजित पवार यांचे ट्वीट; पहा काय म्हणाले!
'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल अशा भावना अजित पवार यांनी बोलून दाखवल्या आहेत.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान या घोषणेनंतर पक्षात आणि पवार कुटुंबात काय प्रतिक्रिया आहे याची उत्सुकता अनेकांना आहे. एनसीपीत अजित पवार यांच्यासह काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांत रंगल्या होत्या. पण त्या बातम्यांना फेटाळत अजित पवारांनी ट्वीटर द्वारा नव्या कार्यकारी अध्यक्षांची आणि त्यांच्यासह जबाबदारी सोपावलेल्या अन्य 7 जणांचेही अभिनंदन करत पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. NCP New Working Presidents: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांची मोठी घोषणा; कार्यकारी अध्यक्ष हे नवं पद तयार करत या 9 जणांमध्ये जबाबदारीचं विभाजन .
पहा अजित पवार यांचे ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)