Ajit Pawar Video: 'मी थांबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तू वाजवतोय'; तुतारी वाजवणाऱ्याला अजित पवारांचा टोला
आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुतारी वाजली
आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुतारी वाजली आणि अजित पवार यांनी मी थांबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तू वाजवतोय... असे वक्तव्य करताच उपस्थित नागरिकांमध्ये जोरदार हशा पिकला. अजित पवार यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिले आणि तुतारी हे चिन्ह दिले आहे. अजित पवारांच्या या हजरजबाबीमुळे अनेकांनी त्यांचे कौतृत केले आहे.
पाहा व्हिडिओ -
कसब्याच्या मंडपात अजित पवारांसमोर स्वागतासाठी तुतारी वाजविण्यात आली... पण बाईट सुरू होणार असल्यानं लगेच थांबवायला सांगितली...
"मी थांबवायचा प्रयत्न करतोय आणि हे वाजवतायत"😀
अजित पवार प्रतिक्रिया बाईट सुरू होण्याच्या आधी@AjitPawarSpeaks pic.twitter.com/XTO9thATgr
— Amol Dharmadhikari (@AmolDharmadhik7) September 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2024 10:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

