Ajit Pawar Banner: वर्षा बंगल्याच्या परिसरात झळकले अजित दादाचें बॅनर, मजकूरात लिहले.. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री
त्यामुळे आता चर्चां रंगली आहे.
Ajit Pawar Banner: जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. तेव्हा अनेक नेत्यांना अजित दादांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी याकरिता बॅनरबाजी केली. या गोष्टीला काही दिवस उलटून गेले असताना देखील पुन्हा मुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर पाहायला मिळत आहे. 22 जुलैला अजित पवार यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा अजित पवार मुख्यमंत्री लिहलेला बॅनर चर्चेत येत आहे. या बॅनरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. वर्षा बंगलाच्या परिसरात अजित पवार मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर झळकला आहे. हा बॅनर सलीम सारंग यांच्या कडून लावण्यात आला आहे. जनतेच्या मनतील मुख्यमंत्री अजित पवार, असा आशय यावर लिहण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)