Ajit Doval at Mumbai: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर, दौऱ्यामागचं नेमक कारण काय?

गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत मोठी गर्दी असते तरी मुंबईसह महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Ajit Doval at Mumbai: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर, दौऱ्यामागचं नेमक कारण काय?
Ajit Doval (Photo Credits-PTI)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) हे मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते काही विशेष भेटीगाठी घेणार आहे. आज सकाळीच महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. तसेच अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही (CM Eknath Shinde) भेट घेणार असल्याची चर्चा आहे. अजित डोवाल पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish Sheth) तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भेटणार आहेत. गणेशोत्सवा (Ganeshotsav) दरम्यान मुंबईत मोठी गर्दी असते तरी मुंबईसह महाराष्ट्राच्या (Maharashtra) सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. तरी या दौऱ्यामागचं नेमक कारण काय हे अद्यापही पुढे आलेलं नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).