Ahmednagar Train Fire: अहमदनगर- आष्टी रेल्वेला भीषण आग, शिराडोह परिसरात घडली घटना
मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे.
अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या पाच डब्यांना आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही आहे. आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती आहे. नगरमधील शिराडोह परिसरातील रेल्वेला ही आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. ही आग लागताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आलं, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. (हेही वाचा - Solapur News: सोलापूरात भीम आर्मी कार्यकर्त्यांचा चंद्रकांत पाटीलांवर शाई फेक, भाजपाविरोधात घोषणाबाजी)
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)