Chandrayan 3 Landing: चांद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंग नंतर मुंबईतील प्रवाशांनी लोकल ट्रेन मध्ये गायल 'जन गन मन', पाहा व्हिडिओ
चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. विविध ठिकाणी फटाके फोडून हा आनंदाचा क्षण साजरा केला जात आहे. तर काही ठिकाणी भारत माता की जय असा घोषवारा करत नागरिक हा क्षण साजरा करत आहे.
Chandrayan 3 Landing: चाद्रंयानच्या यशस्वी लॅंडिंग नंतर देशभरात कौतुकांचे आणि आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक जण हा सण आपआपल्या परिने साजरा करत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चंद्रावर पोहचणारा भारत हा चौदा देश आहे. सोबत काल चंद्राने दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला भारत देश आहे. त्यामुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहे. हा आंनदी क्षण साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी इस्त्रोला सोशल मीडियावर वरून शुभेच्छा दिल्या. मुंबईकरांनी लोकल मध्ये राष्ट्रगीत गाऊन हा क्षण साजरा केला आहे.या आनंदी क्षणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सोबत काल अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी भारत माता की जय असा घोषवारा करत जल्लोष साजरा करत आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनवर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. चांद्रयान चंद्रावर पोहचल्यावर नागरिकांचा आंनद गगनात मावेनासा झाला आहे.
अंधेरी रेल्वे स्थानकावर साजरा केला हा क्षण