Adarsh School Badlapur Sexual Assault Case: '...त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको', आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत शहरभर झळकले पोस्टर्स

सुप्रिया सुळे यांनी या लैंगिक छळ प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Adarsh School Badlapur Sexual Assault Case (संग्रहित संपादित प्रतिमा)

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूरमध्ये आदर्श शाळेतील मुलींसोबत झालेल्या लाजिरवाण्या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेविरोधात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवला आहे. बदलापूरमध्ये आदर्श शाळेच्या सफाई कामगाराने तीन आणि चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. मात्र याबाबत एफआयआर दाखल करण्यास उशीर झाल्याने महाविकास आघाडीने शिंदे सरकारवर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी या लैंगिक छळ प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अशाप्रकारे या घटनेमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या दरम्यान बदलापूर येथे, ‘त्या दुर्दैवी प्रकरणावर विकृत राजकारण नको’, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अहवालानुसार, शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या समर्थकांनी हे पोस्टर्स लावले आहेत.

पोस्टरवर लिहिले आहे, ‘बदलापूरकर म्हणून आम्ही त्या दुर्दैवी प्रकाराचा निषेधच करतो. पण, त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको. #MyChildNotForPolitics’ (हेही वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर आदर्श शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक)

आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत शहरभर झळकले पोस्टर्स -

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)