Aaditya Thackeray यांची महाराष्ट्र भाजप, शिंदे गटाकडून होत असलेल्या 'आदु बाळ' उल्लेखावर पहिल्यांदा प्रतिक्रिया समोर (View Tweet)
अनेकदा भाजपा, शिंदे गटाकडून किंवा ट्रोलर्स कडूनही आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख 'आदू बाळ' करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मागील काही दिवसांत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्या परदेशी दौर्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या ट्वीट्स नंतर हे दौरे रद्द झाल्याचं देखील जाहीर करण्यात आलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौर्याबद्दलही काही खुलासे केले आहेत. दरम्यान यानंतर सोशल मीडीयात एक्स (पूर्वीचे ट्वीटर) यावर शिंदे गट आणि महाराष्ट्र भाजपा याकडून त्यांच्या इंग्लंड दौर्यांबाबत, दावोसच्या आणि उद्धव ठाकरेंच्या आजारपणात त्यांनी केलेल्या परदेश दौर्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. मात्र टीकेला आदित्य ठाकरेंनी आज एक ट्वीट करतच उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांचं उत्तर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)