Women Caught Consuming Drugs In Washroom: पुण्यातील मॉलच्या वॉशरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळल्या तरुणी, धक्कादायक व्हिडिओ आला समोर (Watch Video)

हा व्हिडिओ पुण्यातील तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाची वाढती समस्या अधोरेखित करतो. या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Women Caught Consuming Drugs In Washroom (PC-X@punekarnews)

Women Caught Consuming Drugs In Washroom: पुणे-अहमदनगर रोडवरील एका प्रसिद्ध मॉलमध्ये असलेल्या एका पबच्या वॉशरूममध्ये तरुणी ड्रग्ज (Drugs) घेताना दिसत असलेल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे. हा व्हिडिओ पुण्यातील तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाची वाढती समस्या अधोरेखित करतो. या व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांच्या वापराविरूद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन सोशल मीडिया यूजर्संकडून केलं जातं आहे. (हेही वाचा - Pune Drug Case: पुण्यातील बारमध्ये तरुणांनी केलं अंमली पदार्थाचे सेवन; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 8 जणांना अटक, 5 पोलीस निलंबित)

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)