औरंगाबाद: 6 व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीने झोपडपट्टी भागात सुरु केली 'Mohalla Library'

औरंगाबाद येथील 6 वर्षीय मुलाने झोपडपट्टी भागात 6 ठिकाणी 'Mohalla Library' सुरु केली आहे.

Aurangabad: Class 6 Student Opens 'Mohalla Library' (Photo Credits: ANI)

औरंगाबाद येथील 6 वर्षीय मुलाने झोपडपट्टी भागात 6 ठिकाणी 'Mohalla Library'  सुरु केली आहे. मिर्झा मरियम असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. "शाळा बंद असल्यापासून माझ्या आजूबाजूची मुलं सतत खेळत असतात. म्हणून मी वाचनालय सुरु करण्याचा विचार केला. जेणेकरुन ही मुलं वेळेचा सदुपयोग करु शकतील," असे मिर्झाने सांगितले.

"माझ्या वडीलांना गेल्या वर्षी मला 150 पुस्तकं गिफ्ट केली होती. माझ्याकडे 150 हून अधिक पुस्तकं आहेत. मी ती सर्व पुस्तके वाचनालयात ठेवली आहेत. त्यामुळे आता वाचनालयात 500 हून अधिक पुस्तकं आहेत. मुलं त्यांच्या आवडीचे पुस्तकं घरी घेऊन जावू शकतात. ते पुस्तक त्यांना 2-3 दिवसांत परत करावे लागेल," असेही ती पुढे म्हणाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now