Long Tunnel Found in Byculla: मुंबईतील जे.जे रुग्णालयात ब्रिटीशकालीन भुयार, Watch Video

हे भुयार 130 वर्ष जुनं असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात असलेल्या डी.एम. पेटीट इमारतीमध्ये हे भुयार आढळलं.

Long Tunnel Found in Byculla (PC - Twitter)

Long Tunnel Found in Byculla: मुंबईतील सर जे जे रुग्णालयात ब्रिटीशकालीन भुयार आढळलं आहे. हे भुयार 130 वर्ष जुनं असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णालय परिसरात असलेल्या डी.एम. पेटीट इमारतीमध्ये हे भुयार आढळलं. दरम्यान, सदर भाग हा नर्सिंग कॉलेजचा असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही ठिकाणी संशयास्पद गोष्टी दिसल्या. त्यानंतर त्यांनी कुतूहल म्हणून अधिक खोलात जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी तिथलं झाकण काढताच थोडी पोकळी असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने पुढील पाहणी केली. त्यानंतर त्यांना याठिकाणी भुयार आढळलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now