Mumbai: मुंबईतील केनेडी ब्रिजजवळ कुत्र्यासोबत फिरत असलेल्या 23 वर्षीय विद्यार्थिनीसमोर अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीला अटक

ही घटना जूनमध्ये घडली होती. पीडितेने गमदेवी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: दक्षिण मुंबईतील केनेडी ब्रिजजवळ 23 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आपल्या कुत्र्याला घेऊन जात होती. यावेळी तिच्यासमोर कपडे काढून अश्लील हावभाव केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना जूनमध्ये घडली होती. पीडितेने गमदेवी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला.

एका पोलिक अधिकाऱ्याने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही बस स्टॉप, रेल्वे स्थानक, इतर सार्वजनिक ठिकाणी, झोपडपट्ट्या इत्यादी ठिकाणी पोस्टर लावले होते. एका माहितीच्या आधारे आम्ही 32 वर्षीय आरोपीला बुधवारी फूटपाथवरून अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील भदोहीचा रहिवासी असून तो मुंबईत चित्रकार म्हणून काम करतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)