Boy Dies after Fall in Manhole: खेळताना 4 वर्षीय चिमुकल्याचा Manhole मध्ये पडून मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.

Photo Credit- X

Boy Dies after Fall in Manhole: अंगणात खेळता खेळता मॅनहोलमध्ये पडून एका 4 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. समर शेख असं मृत मुलाचे नाव आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. समर शेख असे 4 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. मॅनहोलवर झाकण ठेवण्यात आले होते. याच झाकणावर समर शेख हा उभा होता. मात्र, झाकण कुचकामी असल्याने समर हा मॅनहोलमध्ये पडला. पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही समर हा कुठे दिसत नसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध घेतली. 5 तास शोध करूनही तो कुठेही दिसून आला नाही. यावेळी एका व्यक्तीने हौदात डोकावून बघितले असता, समरचा मृतदेह हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. (हेही वाचा: Polar Bear Viral Video: ध्रुवीय अस्वलाचा हा मजेदार व्हिडिओ होत आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल)

व्हिडीओ पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif