Beed Accident: अंबेजोगाई-लातूर रस्त्यावर स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भिषण अपघात; 4 ठार
महाराष्ट्रातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी दृश्यमानता कमी असल्याने अपघाताच्या घटना घडत आहे. एका घटनेत ट्रकला कार आदळून अपघात झाला. या अपघातात 4 ठार झाले आहेत.
Beed Accident: बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री कार आणि कंटेनरचा भीषण अपघात (Car and Container Accident) झाला. यात चार जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. अंबेजोगाई-लातूर रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मृत कुटुंब लातूर जिल्ह्यातील जगलपूर येथून छत्रपती संभाजीनगरला जात होते. मात्र, मुसळधार पावसात कार कंटेनरला धडकली आणि नंतर कंटेनरखाली अडकली. यात कारचा चुराडा झाला. तर कारमधील सर्वांचा मृत्यू झाला.
कारमधील चारही जण जागीच ठार झाले. बर्दापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने सर्व मृतदेह अंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला. (हेही वाचा: Jalna Accident: जालना-वडीगोद्री रोडवर ट्रक आणि MSRTC बसची जोरदार धडक; 6 ठार, 18 जखमी (Watch Video))
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)