Building Collapses In Dombivli: डोंबिवलीत 3 मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंबे अडकल्याची शक्यता, बचाव कार्य सुरू
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढले.
Building Collapses In Dombivli: ठाण्यातील डोंबिवलीत शुक्रवारी तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाचे जवान, महापालिका प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मीडियाशी बोलताना केडीएमसी आयुक्तांनी सांगितलं की, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 70 वर्षीय पुरुष आणि 45 वर्षीय महिला अडकले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढले. मात्र तरीही दोन जण अडकल्याची माहिती समोर येत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)