Army Truck Fall into Valley in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रक दरीत कोसळल्याने 3 सैनिकांचा मृत्यू, 4 जखमी
अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी जिल्ह्यात मंगळवारी ट्रक खोल दरीत कोसळल्याने लष्कराचे तीन जवानांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले.
Army Truck Fall into Valley in Arunachal Pradesh: इटानगरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली, अपघातात तीनही सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती अजून मिळालेली माही. हवलदार, नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष अशी मृत जवानांची नावे आहे. आर्मीच्या ईस्टर्न कमांडर यांनी जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना त्यांना मरण आले भारतीय सैन्य त्यांच्या कुटुंबांसोबत खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी शएकव्यक्त करताना म्हटले आहे. (India-China Violent Face-Off in Ladakh: गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य दलाचे जवळजवळ 20 जवान शहीद; चीनचे 40 जवान जखमी, त्यातील काही ठार झाल्याचे वृत्त- Reports)
अरुणाचल प्रदेशमध्ये आर्मी ट्रकचा भीषण अपघात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)